– बंजारा समाजाची मागणी – विलास चव्हाण
डिग्रस-दरव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ राठोड हे 2004 ते 2024 पर्यंत डिग्रस-दरव्हा-नेर मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून येणारे बंजारा समाजाचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने विलास चव्हाण यांनी केली आहे.
सन 204 साली कै. बाळासाहेब ठाकरे यांनी आ. संजय राठोड यांच्यावर विश्वास दाखवला आणि तात्कालिक गृहमंत्री मा.आ. माणिकराव ठाकरे यांचा तब्बल बावीस हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. आ. राठोड हे 20% राजकारण आणि 80 समाजकारणाच्या जोरावरच सलग पाचवेळा आमदार झाले आहेत. 2009 झाली संजय देशमुख यांना तब्बल पन्नास हजार मतांनी पराभव केले आणि सर्वाधिक मतांनी येणारे बंजारा समाजाचे एकमेव आमदार ठरले तर नुकत्याच झालेल्या 2024 विधानसभा निवडणुकीत मानिक ठाकरे यांना 51000 हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी राज्यातील बंजारा समाजाच्या वतीने विलास चव्हाण यांनी केली आहे.
Discussion about this post