श्रीगोंदा :-(तालुका प्रतिनिधी )२८ नोव्हेंबर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडकुकीत अहमदनगर जिल्हयातून भाजपाला – ४ , राष्ट्रवादी ( अजित पवार ) – ४ , शिवसेना ( शिंदे ) – २ , कॉग्रेस – १ , राष्ट्रवादी ( शरद पवार ) – १ मिळाले असून महायुतील तीन्ही पक्षाला मंत्री पद मिळणार अशी लोकांमधून चर्चा होताना दिसत आहे तर जिल्हयातून मिळालेले यश हे राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांचे श्रेय मानले जात आहे . त्यामुळे भाजपाकडून त्यांना मंत्री पद निश्चित मानले जाते तर शिवाजी कर्डीले , मोनिका राजळे व विक्रम पाचपूते हे भाजपाचे आमदार असून कर्डीले , राजळे हे सुध्दा मंत्री होण्यास इच्छुक आहे . तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे , डॉ किरण लहामटे , संग्राम जगताप , काशिनाथ दाते हे आमदार आहेत शिवसेनेचे अमोल खताळ व विठ्ठल लंघे हे आमदार असले तरी या दोन्ही आमदारांनी माजी मंत्र्यांचा पराभव केल्याने यांची ही मंत्री पदाकरिता लॉटरी लागू शकते . तर हे दोन्ही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेचं शिल्लेदार आहेत . जिल्ह्यात विखे पाटील यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाला मंत्री पद दयावे हे विखे पाटील यांच्यावर अवलंबून असल्याचे संध्या तरी चित्र असले तरी राष्ट्रवादीकडून मात्र संग्राम जगताप व आशुतोष काळे यांचे ही नाव चर्चेत आहे .
या व्यतिरिक्त जिल्हयामध्ये रिपब्लिकन पक्षाची ही मोठी ताकद असल्याने रिपाई विधानसभेकरिता राज्यात जागा दिल्या गेल्या नाही त्या बद्दल्यात मंत्री मंडळात घेवू असे आश्वासन भाजपाकडून दिले गेले त्याचं धरर्तीवर संपूर्ण जिल्हयात रिपाईने जोमाने काम केल्यानेचं जिल्हयासह राज्यात ही महायुतीला मोठे यश आल्यानेचं होणाऱ्या नव्या सरकारमध्ये रिपाई जिल्हयातूनचं प्रतिनिधीत्व दयावे अशी मागणी होताना दिसत आहे तरी जेष्ठंते नुसार गेल्या ४० वर्षापासून सामाजिक व दलित चळवळीत अग्रेसर असणाऱ्या विजय वाकचौरे व श्रीकांत भालेराव यांचे नावे आघाडीवर आहेत .
याबाबत लवकर केंद्रीय मंत्री रामदास आठवले व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून जिल्ह्यातील रिपाईला प्रतिनिधित्व दयावे अशी मागणी करणार असल्याचे विजय वाकचौरे यांनी सांगितले .
Discussion about this post