विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क ने मिरज पूर्व भागात आचारसंहितेची जोरदार अंमल बजावणी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने जिल्हा पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध मद्याची जिल्ह्यातील आयात रोखण्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज चे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक सुपे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मिरज आणि पूर्व भागावर विशेष लक्ष केंद्रित करत महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच गोवा सीमे जवळील अवैध गोवा मेड विदेशी मद्य वाहतुकीवर अंकुश ठेवला तसेच ग्रामीण भागातील हातभट्ट्या देखील उध्वस्त करत तब्बल ७७०० लिटर रसायने हस्तगत केली त्याचप्रमाणे अवैध पद्धतीचे ४७५ लिटर देशी विदेशी मद्य साठा हस्तगत करण्यात यश आले तर २८ विविध गुन्हे दाखल करत ३२ आरोपीना अटक केली आहे. आचारसंहिता काळात या धडक कारवाईमध्ये तब्बल ५,६३,६४५ /- रुपयांचा मुद्देमाल ३ वाहनांसह ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाई मध्ये निरीक्षक दीपक सुपे यांच्यासह त्यांचे सहकारी दुय्यम निरीक्षक क्र १ अजय लोंढे,दुय्यम निरीक्षक क्र २ लक्ष्मण पोवार. दुय्यम निरीक्षक क्र ३ जयसिंग खुंटावळे सहा दुय्यम निरीक्षक क्र ३ दिलीप सानप, जवान स्वप्नील अटपाडकर, वैभव पवार, श्रीमती कविता सुपने, श्रीमती शाहीन शेख आणि वाहन चालक स्वप्नील कांबळे यांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये नेमण्यात आलेल्या भरारी पथकानि निरीक्षक राजकुमार खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली कामगिरी केली आहे.
Discussion about this post