श्रीगोंदा:-(तालुका प्रतिनिधी )२७ नोव्हेंबर
श्रीगोंदा शहरापासून जवळच्याच अंतरावर राहणाऱ्या एका ड्रायव्हरने येथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी घडला आहे. कामानिमित्त बाहेर गेलेल्या तिच्या आई-वडिलांना विचारण्यासाठी गेलेल्या त्या इसमाने नमुद अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्कार या कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर असे की दिनांक २५ रोजी आपल्या नियोजित कामानिमित्त बाहेर गेलेल्या आई-वडिलांना विचारत घरी आलेल्या त्या इसमाने घरात असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलीचे वडील घरी विसरलेल्या वस्तू घेण्यासाठी घरी परतल्यावर हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
सदरील आरोपी हा या कुटुंबीयांच्या तीन-चार महिन्यांपासून गाडीवर ड्रायव्हर म्हणून घरी ये/जा करत होता. यादरम्यानच मुली सोबत त्याचा परिचय झाला होता. त्यातूनच पुढे हा प्रकार घडला. मुलगी अल्पवयीन असल्याने आईने दिलेल्या फिर्यादीनुसार नमूद आरोपी विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये सदरील गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस कसून करत आहेत.
Discussion about this post