सोयगाव :
ग्रामस्थांची गैरसोय
सोयगाव
बँक ऑफ महाराष्ट्र बनोटी (ता.सोयगांव) शाखेचे गावाबाहेरील दोन किलोमीटर अंतरावरील बिल्डींगमधे स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने खातेदारकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी, अबाल वृद्धांसह शालेय विद्यार्थीची गैरसोय होणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र बनोटी ही शाखा जिल्ह्यातील सर्वात मोठी शाखा असून या बँकेला बनोटी परिसरातील जवळपास वीस गावे जोडली आहेत. वीस गावातील जवळपास पंचवीस ते तीस हजार खातेदार सभासद असून निराधार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांचे खाते आणि विशेष करून सर्व शेतकऱ्यांची खाती या शाखेत जोडलेली आहेत. बँक ही ग्रामीण भागातील एकमेव शाखा असून गावाच्या मधोमध, बनोटी स्थानकावर असल्याने गावासह परिसरातील गावातील खातेधारकांसाठी सोयीची आहे. जुनाट झालेल्या बिल्डींगच्या नावाखाली बॅक प्रशासनाने शाखा स्थलांतराची हालचालींना सुरुवात केल्याने बनोटी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन बॅक स्थलांतरास विरोधात ठराव पास केला आहे.
जवळील उपलब्ध जागेत स्थलांतर करण्यास पर्याय देऊन देखील बॅक प्रशासन मनमानी करीत स्थलांतरावर ठाम असल्याने ग्रामस्थांनी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन देऊन कळविले आहे. बॅक स्थलांतर झाल्यास ग्रामस्थ बॅकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी सामुहीक उपोषण देखील करणार आहेत.
बॅक प्रशासनाने स्थलांतर थांबवून ग्रामपंचायतीने उपलब्ध करुन दिलेल्या जागेत स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बनोटी शाखा स्थलांतर झाली तर परीसरातील खातेधारक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर अंतर पायपीट करीत जावे लागणार आहे.
यामुळे खातेदारकांना वेळ व आर्थिक नुकसान होईल व ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांचे हाल होतील. त्यामुळे बनोटी बँक आहे येथेच असावी. बँक स्थलांतरित करू नये, व जोपर्यंत बँक स्थलांतरितचा निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्णय बनोटी परिसरातील खातेदार व नागरिकांनी घेतला आहे.
फोटो ओळ : सोयगाव – बनोटी – येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेची जुनी ईमारत
Discussion about this post