भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
पंढरपूर बस स्थानकात सातत्याने मोकाट गाई गुरे वावरताना दिसतात आणि खाजगी वाहने अस्ताव्यस्त लावलेली दिसतात.या मुळे प्रवाशी वर्ग,बस चालक वाहक यांना विनाकारण त्रास होऊन वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.पंढरपूर तिर्थक्षेत्र असलेले ठिकाण असून येथे बारा महिने विठ्ठल भक्त, वारकरी येतात, साहजिकच या ठिकाणी सातत्याने गर्दी च गर्दी दिसून येते.या बस स्थानकात आणि आवारात मोकाट गाई गुरे आणि रिक्षा,चोर व्हिलर, अस्ताव्यस्त लावलेल्या आढळून येतात.काही रिक्षा वाले तर रिक्षा प्रवाशांना शेड च्या एकदम जवळ घेऊन जातात.
मोकाट गाई गुरे येथे इकडून तिकडे फिरत असतात शोच, मल मूत्र सोडतात, सर्वत्र दुर्गंधी पसरते,डासाचा प्रादुर्भाव होऊन मलेरिया, डेंग्यू सारखे आजार पसरतात.अनेक प्रवाशी मलमुत्र शौच मध्ये घसरुन पडतात.एकंदरीत या समस्ये कडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देऊन मोकाट गाई गुरे कुत्री, आणि खाजगी वाहने यावर नियंत्रण ठेवावे.व प्रवाशी,बस चालक, यांना या समस्येतून मुक्तता करावी.
Discussion about this post