तालुका प्रतिनिधी गणेश बेतवार
पांढरकवडा येथील RTI कार्यकर्ता(व्हिसल ब्लोअर) आकाश अनंतराव सामलवार हे गट ग्राम पंचायत ताडउमरी आणि सिंगलदिप या गावामध्ये झालेल्या प्रशासकीय कामाबद्दल मागितलेल्या माहितीच्या संबंधित माहिती अधिनियम २००५ अंतर्गत कलम १८(१)(ग) व कलम १८(१)(ड) नुसार राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अमरावती यांचे कडे मागील मे महिन्यात दाखल केली तरी खंडपीठाकडून त्यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही.
यावरून असे दिसून येते कि राज्य माहिती आयुक्त हे आपल्या कडील आलेल्या प्रकरणाबद्दल किती संवेदनशील आहे. जर एकएका सुनावणी साठी सुद्धा सहा सहा महिन्याचा कालावधी लागत असेल तर माहिती अधिकारी या कायद्याचा अर्थच काय उरला?
सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी किती दिवस वाट पहायची?खंडपीठाने काही समयसुचकता निर्धारित करावी असे नागरिकांची अपेक्षा आहे.
Discussion about this post