शिरोळ तालुका प्रतिनिधी/ एका मोठ्या दैनिकांमध्ये कुरुंदवाडच्या त्या युवा नेत्यांनी १२ जणांकडून सव्वा कोटी रुपये घेतल्याची चर्चा सुरू असल्याची बातमी छापून आली तालुक्यात युवा नेत्याच्या चर्चेला उदान आलेले आहे.
चौका चौकांमध्ये युवा नेत्याची चर्चा चालू असल्याचे चित्र दिसत आहे. एका मोठ्या दैनिकांमध्ये आलेली बतमी अशी की युवा नेत्यांनी तब्बल एक डझन हून अधिक जणांना महाविद्यालया त नोकरी लावतो असे सांगून1 कोटी 25 लाख रुपये घेऊन एकालाही नोकरी दिली नसल्याने त्यांना हेलपाटे मारायला लावत असल्याचे जोरदार चर्चा आहे.
त्या मोठया दैनिकात असे म्हटले आहे की महाविद्यालयात सुरू असलेल्या या कारभारावर कोल्हापूरचे तात्या आणि डॉक्टरदादा यांनी लक्ष घालण्याची मागणी शहरवासीयातून होत आहे. दरम्यान महाविद्यालयाच्या संचालक पदावर असणाऱ्या तात्यांना विशाल मनाच्या विराज कर्मचाऱ्यांनी माहिती दिली म्हणून युवा नेत्यांनी नोकरीसाठी त्याच्याकडून घेतलेले दहा लाख रुपये परत न देता त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले.
तात्यांच्या बाबतीतही उर्मट भाषा केल्याचे महाविद्यालयासमोर असणाऱ्या कौलारू खोली मध्ये प्राचार्य व प्राध्यापकांत चर्चा आहे. अशी संपूर्ण बातमी एका मोठ्या दैनिकात आल्याने पुन्हा एकदा युवा नेते विषयी चर्चा चालू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्या युवा नेत्याचे गाडगे भरले असल्याची चर्चा कुरुंदवाड नगरीमध्ये रंगत चालली आहे.
Discussion about this post