
न.प.ची सफाई व्यवस्था खोळंबली..
लोणार(ताप्र. सुनिल वर्मा ): – विधानसभेची निवडणूक झाली आता तरी लोणार शहराकडे लोणार न.प.चे लक्ष येईल का?लोणार न.प.चे अध्यक्ष व नगरसेवक यांचे कार्यकाळ संपल्या नंतर अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे लोणार शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
शहरात सर्वत्र घाणीचे कचऱ्याचे ढिगार दिसत आहेत. दोन दोन महिन्यापासून शहरातील काही भागात नाल्याची सफाई झालेली नाही शहरातील घंटागाड्या सुरळीत चालू नाही गाड्यावर असलेल्या कर्मचारी यांना पगार मिळत नाही कर्मचाऱ्याची पगार रखडल्याने यामुळे शहरातील घंटा गाडी ची व्यवस्था खोळंबली आहे. शहरातील नाल्या तुडूंब भरून रस्त्यावर वाहते त्यामुळे व साचलेले पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले यामुळे बऱ्याच भागात रोगराई वाढत चालली आहे.
सफाई कामगार आले तरी नाली न काढता फक्त पाणी समोर कसे जाईल एवढच प्रयोग करतांना दिसत आहे. बऱ्याच महिन्यापासून नाली साफ न केल्याने माती रेती घट्ट बसली आहे नाल्या खोदून काढण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करतात पण कर्मचारी फक्त नाली काढल्याचे देखावा करत आहे. काढलेली नाली कचरा पण उचलल्या जात नाही त्यामुळे परत तो नाल्यात इकडे तिकडे पसरत आहे.या कडे न.प.प्रशासनचे दुर्लक्ष होत आहे.
लोणार सरोवराच्या काठावर डंपिंग ग्राउंड
एकीकडे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले सरोवर वाचवण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च केल्या जात असले तरी लोणार प्रसाशन याकडे गंभीर नसल्याचे दिसत आहे.सरोवरच्या काठावर लोकांनी केले डंपिंग ग्राउंड केले आहे.धारतिर्थ पासून जवळ असलेल्या स्मशानभूमी जवळ रोडच्या काठावर कचरा मेलेले जनावर टाकण्यात येत आहे.शहरालगत संरक्षण भिंतीच्या अवतीभवती घाण पसरली आहे. कोणी
अधिकारी लोणारला भेट देणार त्याआधी रोडची सफाई करण्यात येत असते अन्यथा या रोडला उकिरड्याचे स्वरूप येते..
Discussion about this post