उत्तर तालुका – नान्नज,अकोलेकाटी,बीबीदारफळ व मार्डी भागात घरफोड्या, चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यांच्यासोबत इतर जिल्ह्यातील आरोपी असण्याची शक्यता आहे.
नान्नज परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्या झाल्या आहेत. एका इसमाची दुचाकी चोरीला गेली आहे.
🔹विशेष करून बीबीदारफळ नान्नज वडाळा कळमन कौठाळी मार्डी भोगाव बानेगाव गावडी दारफळ होनसळ या ठिकाणी चोऱ्या घोरफोड्या होण्याची शक्यता जास्त आहे.
🔹बंद घरे टारगेट करून फोडली जात आहेत
🔹 गावात रात्री संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत रात्रगस्तच्या गाडीला सूचना द्याव्यात.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले आहे
Discussion about this post