वाल्मीक सूर्यवंशी/शिरुर .आ.
: लातूरच्या भीमसैनिकांनी दिले नांदेड परीक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना निवेदन
लातूर : लातूर जिल्ह्यात दलित समाजातील अरविंद खोपे, सायली गायकवाड हे शाळकरी विद्यार्थी तसेच सचिन सूर्यवंशी, आकाश सातपुते या युवकांचा जातीय द्वेषातुन अत्यंत अमानुषपने खून करण्यात आल्याच्या घटना मागील दीड दोन महिन्यांच्या काळात घडल्या आहेत. शिवाय विनोद कांबळे, बालाजी कांबळे या दलित युवकांना अमानुष मारहाण करून अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व दलित हत्याकांडातील आरोपीवर खून आणि ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून आरोपीना तात्काळ अटक करावी. अशा मागणीचे निवेदन लातूर येथील भीमसैनिकांच्या एका शिष्टमंडळाने नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीसउपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना 9 ऑगस्ट रोजी दिले आहे.
लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडांच्या घटनांमधील आरोपींविरुद्ध खूनाचे व अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सीआयडी मार्फत चौकशी करून सदरील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी व मयत दलित युवक, विद्याथ व अत्याचारीत युवकांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आदी मागण्यासाठी लातूर येथे तीन दिवसीय जबाब दो आंदोलन केल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी भीमसैनिकांच्या शिष्टमंडळाने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित दलित नेत्यांनी दलित हत्याकांड व अत्याचाराच्या विरोधात पोलीस प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा लवकरच अर्ध नग्न मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात , रिपाइं आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव चंद्रकांत चिकटे, नांदेड येथील रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय सोनवणे, भिमशक्तीचे मोहन माने, प्रा. अनंत लांडगे, अँड .अतिश चिकटे, मराठवाडा सचिव अशोक कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड,
युथ पँथर संघटनेचे संतोष वाघमारे, काँग्रेसचे यशपाल कांबळे,प्रताप कांबळे, राहुल कांबळे,ब्लू पँथर संघटनेचे साधू गायकवाड, रिपाइं (आठवले )पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, मराठवाडा उपाध्यक्ष तथा नांदेड लोकसभा अध्यक्ष सुखदेव चिखलीकर , नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सांगवीकर, नांदेड शहर सरचिटणीस प्रतिक सोनवणे, नांदेड जिल्हा सचिव रामा चिंतोरे, आदींसह तिन्ही पिडीत कुटुंबाचे नातेवाईक व विविध पक्ष -संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते..
Discussion about this post