खापरी (शिवगाव): राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसमध्ये लोकप्रतिनिधी अर्थात आमदार खासदारांसाठी एक जागा राखीव ठेवली आहे. या मंडळींना राज्य सरकारने बसमधून प्रवास सुविधाही मोफत देऊ केली आहे, मात्र वर्षानुवर्ष आमदार- खासदारांनी या सुविधकडे पाठ फिरवल्याने त्यांच्यासाठी राखीव असलेली जागा केवळ औपचारिकता ठरत आहे.
‘ गाव तेथे एसटी’ हे राज्य परिवहन महामंडळाचे धोरण आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ हे ब्रिद घेऊन एसटी वर्षानुवर्ष शहरातूनच नव्हे, तर खेड्यापाड्यातून धावत आहे. गावोगावच्या सर्वसामान्य प्रवाश्यांना त्यामुळे मोठा आधार मिळत आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये सर्वांना स्थान मिळावे,यासाठी लोकप्रतिनिधींसह महिला, वृध्द,अपंग यांच्यासाठी जागा राखीव असतात. परंतु बसणे प्रवास करणारे आमदार , खासदार दिसतच नसल्याची स्थिती आहे. लोकप्रतिनिधींना अपेक्षित ठिकाणी जागा मिळावी, या उद्देशाने शासनाने आमदार – खासदार यांच्यासाठी प्रत्येक बसमध्ये जागा आरक्षित ठेवली आहे. परंतु जिल्यातील आमदार खासदारांचा वैयक्तिक वाहन वापरावर भर असल्याने ते एसटीचा वापर करतांना दिसत नाही.
Discussion about this post