दि.०४/१२/२०२४वार मंगळवार मा.जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब, जिल्हा परिषद……… विषय -वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित वर्तमान कामगार एकता संघ पंतप्रधान शक्ती शालेय पोषण आहार योजनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपासून शासनाकडून थांबले तसेच त्यांचे कडून शासनाचे सन 2023 -24 चे जीआर प्रमाणे काम करून न घेता त्यांचे कडून शिक्षक वर्ग जास्तीचे काम करून घेत आहेत त्याबाबत. वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित वर्तन कामगार एकता संघ पंतप्रधान शक्ति पोषण आहार योजनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपासून शासनाकडून थांबले आणि जिल्हाधिकारी आपणास नम्र विनंती करण्यात येते की, दिवाळीचा एवढा मोठा सण असताना अध्यक्ष शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना मानधन अदा केले नाही. जिल्हा परिषद शाळेतील व माध्यमिक शाळेतील शालेय पोषण आहाराचे कर्मचारी यांची बाजू आजपर्यंत आपण कधी समजून घेतली नाही. गाव पातळीवर काम करत असताना व शाळेत काम करत असताना अतिशय कमी मानधनावरती या कर्मचाऱ्यांचे 2500/-रुपयांमध्ये स्वप्न कसे पूर्ण होणार. अधिकारी महोदय संघटनेच्या पत्राच्या माध्यमातून जिल्हा परिषद वरती जर एवढ्या दोन चार दिवसांमध्ये झाले पोषण आहाराचे कर्मचाऱ्यांचे पगाराची व्यवस्था केली नाही तर जिल्हा परिषद आवारामध्ये संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक काही समस्या असताना स्वतः अधिकारी महोदय आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती यांच्याकडून वारंवार होणारा त्रास हा कामगार सहन करून शाळेतील काम अतिशय चोखपणे व इमानदारीने करतो .अधिकारी महोदय आपण प्रत्येक शाळांना नोटीस काढून शाळेला कळविण्यात यावे ,ते असे 2023 -24 मध्ये शासनाने कामगारांचा काम करण्याचा जीआर काढलेला असताना त्या जीआरप्रमाणे आपले शिक्षक लोक त्यांना विनाकारण वाढिव काम सांगतात वाढिव काम हे तातडीने बंद केले पाहिजे व कामगारांना विनाकारण कामावरून कमी करू नये आजपर्यंत कामगारांनी खूप सोसलं अतिशय कमी मानधनावर काम करणारे महाराष्ट्रात शालेय पोषण आहार योजनेचे कर्मचारी आहेत हे आपणाही जाणून घ्या. तरी सदर पत्राप्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. (संघटनेचे शाखा येवला, निफाड ,चांदवड, दिंडोरी, देवळा ,सिन्नर ,मालेगाव इत्यादी). आपले नम्र.
श्री शरदराव दिनकरराव लोहकरे पाटील. राष्ट्रीय अध्यक्ष. . वर्तमान कामगार संघटना. असे पत्र आज दि.०४/१२/२०२४वार मंगळवार रोजी मा.श्री नितीन बच्छाव साहेब , जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांना वर्तमान कामगार एकता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदराव लोहकरे पाटील यांनी नाशिक जिल्हा परिषद येथे स्वतः दिले
Discussion about this post