प्रतिनिधि संदिप पानपाटिल
धुळे– धुळे जिल्हा, साक्री तालुक्यातील उंभरे गावातील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदयार्थ्यांना मोफत गणवेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या व्यवस्थापनाने केले होते आणि यामध्ये विदयार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुषमा भामरे, शिक्षक प्रमोद खैरनार, शिक्षक प्रमोद पानपाटिल तसेच पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गणवेश वितरित केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकवर्ग आणि पालकांची उपस्थिती महत्त्वाची होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले आणि शालेय पोशाखामुळे त्यांच्या शालेय जीवनात आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Discussion about this post