जगप्रसिद्ध लोणार पर्यटन नगरी येथे गेल्या एक वर्षापासून अंगावरील केस गळालेले व अंगाला जखम व खाज असलेले मोकाट कुत्रे लोणार पर्यटन नगरीतील गल्लोगल्ली बिनधास्तपणे नागरिकांच्या घरांच्या ओट्यावर, अंगणात, रस्त्यावर एवढ्यावरच न थांबता नागरिकांच्या घरात जाऊन अंग खाजवून अंग झटकत असल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या कुत्र्यांवर लक्ष ठेवण्याची वेळ पर्यटन वासियांवर आली असल्याची दिसून येत आहे. घराच्या ओट्यावर नागरिक तसेच घरातील लहान बालके बसत असून अंगणात लहान बालके खेळत असल्याने सहाजिकच अंगावरील केस गळलेले व अंगाला जखम व खाज असलेले कुत्रा ज्या ठिकाणी बसला किंवा ज्या ठिकाणी त्याने अंग झटकले आहे त्या ठिकाणी लहान बालके खेळत असल्याने तसेच त्या ओट्यावर नागरिक व लहान बालके बसत असल्याने नकळत अंगाला खाज व जखम असलेल्या झटकलेल्या या ठिकाणाला नकळत स्पर्श होत असून त्याच हाताने घरात पाणी पिणे किंवा खाने करीत असल्याने यामुळे कुत्र्याला असलेली खाज व जखमेचा संसर्गजन्य होऊन यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. गेल्या एक वर्षापासून अंगावर केस नसलेले व अंगाला जखम व खाज असलेले कुत्रे पर्यटन नगरीत बिनधास्त फिरत आहेत हे संबंधित यंत्रणेला दिसत नाहीत का ? नेमके या कुत्र्यांना काय झाले असावे याबाबत पाहणी करण्यासाठी कोणतीच शासकीय यंत्रणा नाही का ? तरी या समस्येकडे संबंधित यंत्रणा तसेच शासनाने त्वरित लक्ष देऊन या मोकाट कुत्र्यांची आरोग्याची पाहणी करून भविष्यात यामुळे नागरिकांच्या आरोग्यास कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे तसेच या कुत्र्यांना नेमके काय झाले याची पाहणी करून हा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Discussion about this post