लोणार प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
बिबी: विवी ते दुसरबीड
रोडवर ट्रक व अॅम्बुलन्स यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात अॅम्बुलन्सचा चालक जागीच ठार झाला असून, वाहक गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी दि.३ रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अक्षय उकंडा आडे रा. आईचा तांडा, किनगाव जडू असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव असून, या दुर्देवी घटनेने किनगावजट्ट गावावर शोककळा पसरली होती.
सविस्तर असे, की अॅम्बुलन्स ही विवीहून दुसरबीडकडे जात होती. तर समोरून भरधाव ट्रक येत होता. या दोन्ही वाहनांत दुसरबीड रोडवरील पेट्रोलपंपाच्या बाजूला समोरासमोर भीषण टक्कर
झाली. त्यात अक्षय उकंडा आडे रा. आईचा तांडा, किनगाव जट्ट, ता. लोणार हा जागीच ठार झाला तर अॅम्बुलन्स वाहक राजेश्वर वाकळे (वय ३०) रा. वाशी (मुंबई) हा गंभीर जखमी झाला होता. या अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. तसेच, बिबी पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली.
विवी ग्रामीण रुग्णालयाचे १०८ क्रमांकाच्या अॅम्बुलन्सचे कर्मचारी डॉ. देवानंद फड चालक राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमीला तातडीची वैद्यकीय मदत देत विवी ग्रामीण रुग्णालयात हलवले. वाहक वाकळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. बीबी
पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य केले, तसेच वाहतूक सुरूळीत केली. या घटनेचा पुढील तपास विवी पोलिस करत असून, ट्रक चालकाला ताव्यात घेण्यात आले आहे. अपघातात अॅम्बुलन्स अक्षरशः क्षतीग्रस्त झाली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती
Discussion about this post