संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत शनिवार , दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी कॉम्प्युटर सुरक्षा दिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच तळेगाव ढमढेरे येथील काजल कॉम्प्युटर या संगणक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष किरण ढमढेरे उपस्थित होते.
यावेळी किरण ढमढेरे यांनी आजकालच्या आधुनिक युगात संगणकाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच संगणक हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा कसा अविभाज्य घटक बनला आहे याबद्दल माहिती सांगितली व संगणक विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते, या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणही याप्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक जालिंदर आखाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post