भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
दिल्ली हून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते एकमत झाल्याचे सांगून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस होणार तिसऱ्यांदा विराजमान होणार.असे सांगितले.महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असल्याने कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर यांच्या इराणी वाडी येथील कार्यालया बाहेर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.ठिक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी हातात झेंडे घेऊन हवेत फडकविले, वाद्यांचा तालावर पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी नृत्य केले, घोषणा दिल्या, प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येते होता.सर्वच कार्यकर्ते एकत्र येऊन एकमेकांना मिठाई भरवत होते.5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता मुंबई आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदावर शपथ सोहळा होणार आहे.कांदिवली चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर यांच्या कार्यालया बाहेर नगरसेवक व मंडळ अध्यक्ष बाळा तावडे, नगरसेवक कमलेश यादव, नगरसेविका प्रियांका मोरे, नगरसेविका लिना देहरकर, नगरसेविका प्रतिभा गिरकर, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Discussion about this post