मालेगाव –
येथून जवळच असलेल्या नेतनसा गावातील एकाच कुटुंबातील ट्रक आणि इरटिका कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले, दैव बळवंत्तर म्हणून या अपघातातील 2 लहान मुलं सुखरूप वाचली. नेतनसा येथील दवाखान्यात जाण्यासाठी अकोला गेले होते.
दवाखाना आटोपून हे सर्व कुटुंब परतत होते, दरम्यान मेहकर रोडवर चांडास गावाजवळ रात्री 8.40 वा. गाडीला भीषण अपघात झाला, समोरून येणारा ट्रक आणि इरटिका गाडीमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात गाडी चालवीत असलेले दत्ता नत्थूजी बाजड आणि बाजूला बसलेले अशोक भिवंसन बाजड हे जागीच ठार झाले तर सतीश बाजड आणि त्याच्या आई गंभीर जखमी झाले, तर नत्थूजी बाजड आणि दोन बाळके किरकोळ जखमी झाले
अपघात इतका भीषण होता की गाडीचा अगदी चुराडा झाला, चांडास गावातील गावकर्यांनी अपघात ग्रस्ताना वेळीच मदत केली, त्यामुळे नेतनसा गावावर अक्षरशः शोककला पसरली.
Discussion about this post