याप्रसंगी खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाबाजी काळे यांचे हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथे जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. शालेय विद्यार्थिनींना जंतनाशक गोळीची मात्रा माननीय आमदार यांच्या हस्ते देण्यात आली.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथील सर्व कामकाज वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची माननीय आमदार साहेब यांनी आस्थेने विचारपूस केली.
आरोग्य केंद्रास आवश्यक असणाऱ्या बाबींची त्यांनी माहिती घेतली आणि अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी केशव आरगडे माजी उपसरपंच काळुस श्री.पप्पू राक्षे युवा सेना अध्यक्ष श्री. भाऊ जरे सरपंच वाकी श्री. प्रविण कोरडे उपसरपंच तुकाईवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ मानकरी डॉ. हर्षाली मुराडे डॉ. इंदिरा पारखे आरोग्य सेविका शोभा दौंडकर ,आशा दौंडकर , वृषाली वैष्णव , राजश्री कंगवे , पार्वती कोरडे ,वैष्णवी घोलप , गजानन दुतोंडे , सुहास टकले हे यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post