प्रतिनिधी : दशरथ दळवी
दिनांक ०५-१२-२०२४ रोजी रोजी आदर्श मानव समाज सेवा संघ ओसरविरा घोरखनपाडा मार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवणे व साफसफाई करण्यात आले. आपला गांव स्वच्छ गांव व कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवित होते तसेच आज ओसरविरा गावातील घोरखनपाडा येथील रहिवासी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ते ओसरविरा गावात येणाऱ्या रस्त्याचे खड्डे बुजवण्यात आले व बाजूला साफसफाई करण्यात आली या वेळी मा. श्री. नरेश कोरडा ओसरविरा गावचे सरपंच उपस्थित राहून या मोलाचे कार्याला उद्घाटन करण्यात आले तेव्हा अरविंद घोरखना माजी सदस्य, धर्मा घोरखना, संजय घोरखना, मधू घोरखना, भिवा घोरखना, मंगल घोरखना, व गावातील पाड्यातील इतर ग्रामस्थ द्वारे हे कार्य करण्यात आले
Discussion about this post