जांब /वार्ताहर :- मयुर कुथे…… लहानपणापासूनच कबड्डी खेळाची आवड असलेली कुमारी स्नेहल बोलणे हिची शालेय क्रीडा स्पर्धेत मुलींच्या 19 वर्षीय वयोगटात झालेल्या कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर तिची निवड करण्यात आली त्यामुळे ह्या विद्यार्थिनीचे सर्वत्र अभिनंदन करीत आहेत सदर विद्यार्थिनी ही सुदामा ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे शिक्षण घेत असून तिने आजपर्यंत तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आपलं आणि शाळेचे नाव उंचावलेला आहे स्नेहल हिला कबड्डी खेळाचे बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळत आले त्यात महत्त्वाची बाब म्हणून तिचे वडील हे क्रीडा शिक्षक असल्यामुळे सादरी विद्यार्थिनीची ओढ ही क्रीडा क्षेत्राकडे वळली खेळासोबतच तिने अभ्यासाकडे सुद्धा चिकाटीने लक्ष दिले परंतु तिची पहिली पसंती म्हणजे कबड्डी त्यामुळे आज तिला यशाचे शिखर काढता आले सध्या ही विद्यार्थिनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता अकोला येथे कबड्डी स्पर्धेचे सराव करीत आहे राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा ही 6 डिसेंबर पासून ते 11 डिसेंबर पर्यंत हरियाणा येथील भीम स्टेडियम भिवानी येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे कबड्डी संघाचे नेतृत्व करणार आहे असे संबंधित क्रीडा विभागाने एका लेखी पत्राद्वारे अधिकृतरित्या जाहीर केले सध्या स्नेहल ही निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे सध्या तिच्या सराव जिल्हा क्रीडा संकुलन अकोला येथे राष्ट्रीय स्पर्धेकरिता प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले असून कबड्डी खेळाचे कौशल्य प्राप्त करीत आहे सदर विद्यार्थिनीची भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तिने सांगितले की जिद्द आणि चिकाटी असली की कोणतीही गोष्ट शक्य नाही आणि त्यामुळे कोणताही ध्येय प्राप्त करता येतो.
राष्ट्रीय स्पर्धे करता निवड झालेल्या स्नेहलने आपल्या यशाचे श्रेय आई आणि वडील स्नेहल चे वडील हे सुद्धा क्रीडा शिक्षक आहेत सध्या ते जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या येथे मुख्याध्यापक पदावर आहेत तसेच आपल्या यशाचे श्रेय ती शिकत असलेल्या सुदामा ज्युनिअर कॉलेजचे मोहाडी येथील प्राचार्य के एम देशमुख, बी ए रासे सर तसेच सुदामा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या यशाचे श्रेय दिले
Discussion about this post