विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूरः तालुक्यातील भादली येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सदर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियांसमवेत सोमवारी रात्री झोपली होती
. परंतु तिचे कुणीतरी आमीष दाखवून अपहरण केले. या प्रकरणी सदर मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूद्ध शिवूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार चेतन ओगले हे करीत आहेत.विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा
Discussion about this post