वरोरा तालुका प्रतिनिधी :- उमेश कोटकर
वरोरा तालुक्यातील माढेली येथील पारस कॉटन जिनिंग ला मंगळवारी दु. १. ३० वा चे सुमारास अचानक आग लागली. अंदाजे ६८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस गाडी मधून रिकामा करून निघून जातात. त्या कापसाला ट्रॅक्टर लोडर च्या साहाय्याने गंजी लावण्याचे काम सुरु होते. यावेळी अचानक ट्रॅक्टर लोडर च्या बॅटरी मध्ये शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे या गंजीला आग लागली. आग लागताच येथील मजुरांनी आग विझवन्याचे प्रयत्न केले. याची सूचना लगेच अग्निशामक दलाला देताच जी. एम. आर. वर्धा पॉवर कंपनी आणि नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या येताच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत अंदाजे १ हजार क्विंटल कापूस आगेमध्ये भस्म सात झाला होता. यामध्ये ट्रॅक्टर चालक केशव शर्मा, वय ३२ वर्ष याच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
Discussion about this post