कोपरगाव तालुका प्रतिनिधी / प्रशांत टेके पाटील
दिवाळी पासून थंडीला सुरुवात झाली होती . त्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली बहरायला लागली होती . परंतु गेल्या तीन चार दिवसांत थंडी अचानक कमी होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्या मुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने नदी, नाले , ओढे सातत्याने वाहत होते . त्यामुळे विहीरी व विंधन विहिरी आदींच्या पाणी पातळीत चांगली वाढ झालेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी, हरभरा , कांदा आदी पिकांची पेरणी किंवा लागवड वाढवलेली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीला चांगली सुरुवात झालेली होती. या थंडीमुळे पिकेही चांगली बहरायला सुरूवात झालेली होती. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून अचानक थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. या ढगाळ वातावरणामुळे सर्वच पिकांवर मावा, तुडतुडे,फुलकिडे, पांढरी माशी आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्यामुळे पिके कोमेजून जाऊन वाढ मंदावली जाते. परीणामी पिके आजारी पडून त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादन वाढीवर होतो.साहाजिकच उत्पादन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. निदान उत्पादन खर्च तरी निघावा यासाठी बळीराजा महागड्या किटकनाशकांची फवारणी करताना दिसत आहे.शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही पण पिके वाचविण्यासाठी हा सगळा अट्टाहास करावा लागतो आहे
Discussion about this post