फटाके फोडून साखर वाटप
मुंबई येथे आझाद मैदानावर भाजपा महायुती सरकारच्या नवीन सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेताच भाजपा महायुती पदाधिकाऱ्यांच्याकडून तासगाव शहरात स्टॅन्ड चौक येथे फटाके फोडून व साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजपा महायुतीला भरघोस यश मिळाले. भाजपच्या नेतृत्वात नवीन महायुती सरकार सत्तेवर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व विविध मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांचे बरोबरच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे व अजित दादा पवार यांनीही पद व गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीची घोषणा होताच तासगाव शहरात भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी जनतेत साखर वाटप करण्यात आली.
यावेळी भाजपा पंचायत राज जिल्हाध्यक्ष महेश पाटील, रवींद्र साळुंखे जिल्हा सरचिटणीस, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दाजी चव्हाण, आरपीआयचे भंडारे, श्रीपाद खरे, मिलिंद सुतार,प्रसन्न गोसावी, विनायक खरमाटे, विनय संकपाळ, पोपट हंकारे, संतोष पोळ आधी मोठ्या संख्येने भाजप शिवसेना आरपीआय राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post