गुहागर प्रतिनिधी (नरेश मोरे) :
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ (रजि.) गाव कर्दे खालची वाडी या मंडळातर्फे जल-जीवन योजनेसाठी आर्थिक भांडवल जमा करण्यासाठी दोन अंकी नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. या नाट्यकातून जे आर्थिक भांडवल जमा होईल ते वाडीतील ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे, अश्या कुटुंबाना देण्यात येणार आहे. जेणेकरून या कुटुंबावर या जल-जीवन योजनेसाठी जो आर्थिक भार बसलेला आहे. तो कमी होईल या दृष्टीने मंडळाने मुंबई ठिकाणी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह (पश्चिम) दादर , येथे शनिवार दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता , हास्य आणि उत्कंठेने मंतरलेल दोन अंकी मराठी नाटक खरं म्हणा वा खोटं या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. जागतिक दर्जाच्या लेखकाचं विस्मृतीतील कस्तुरी पुष्प अर्थात रत्नाकर मतकरी लिखित व दिग्दर्शक संजीव येंद्रे , तर कलाकार – संजीव येद्रे,विनोद बारस्कर,सुशांत बारस्कर, श्रीकांत बारस्कर, शंकर बारस्कर,चंद्रकांत बारस्कर, निलेश बारस्कर,शशांक गावणंग,सुमित पंडये,सोनल पडवळ,वैभवी आंबेकर, आदित्य आंबेकर, नेहा बारस्कर,विश्वास ठोंबरे, सुनील येद्रे, दर्शन बारस्कर हे आहेत. तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून जल-जीवन निधी संकलनासाठी सहकार्य करावे ,असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क हरेश आंबेकर – ९७५७४०१९७७ .
Discussion about this post