सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कालबद्ध कृती आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद (पश्चिम विभाग बेंच), पुणे यांनी स्थापित केलेल्या उच्चस्तरीय नियंत्रण समितीच्या २० व्या बैठकीचे नियोजन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालीकेच्या मुख्यालयात संपन्न झाली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी डॉ डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांचे स्वागत केले यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता (IAS), अति आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त (मुख्यालय) वैभव साबळे, आरोग्य अधिकारी (घनकचरा व्यवस्थापन) डॉ रवींद्र ताटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सब रिजनल ऑफिसर डॉ. व्ही व्ही किल्लेदार, वालचंद कॉलेज चे प्रो. प्रताप सोनवणे आणि पर्यावरण अभियंता अजित गुजराथी उपस्थित होते. या बैठकी मधे NGT ने दिलेल्या सुचने प्रमाणे मुद्देनिहाय घनकचरा प्रकल्प बाबत आढावा घेण्यात आला. साधारणपणे ११ मुद्दया बाबत चर्चा करण्यात आली आहे. जुन्या साठलेल्या कचऱ्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करण्यात करण्यात येते तसेच दैनंदिन गोळा होणारा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता कोणत्या यंत्रसामुग्री आहेत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. मा.विभागीय आयुक्त यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत सक्त सूचना दिल्या. घरातून गोळा होणारा कचरा हा शंभर टक्के वर्गीकरण करूनच घेण्याबाबत देखील सूचना या वेळी दिल्या. बांधकाम राडारोडा व बहुचर्चित कृष्णा नदीच्या पाणी प्रदूषणाला नेहमी कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचा देखील सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यात येत असल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी विभागीय आयुक्तांना माहिती देताना सांगितले. सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबतही प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत एमपीसीबीला सूचना देण्यात आल्या तसेच सिंगल युज प्लास्टिकची ची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या..
Discussion about this post