. दि१० ऑगस्ट शनिवारी सायं ५ वाजता स्थानिक राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाच्या हॉल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कार भारती वाशिम शाखेचे ॲड अभय घुडे, प्रमुख पाहुणे पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध श्री ना.च. कांबळे सर हे होते. तर व्यासपीठावर सौ संध्याताई देशमुख, सौ.आरती बावणे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात द्विप प्रज्ज्वलन तथा मातां सरस्वती तथा नटराज पूजनाने झाली. यानंतर प्रा. संदीप देशमुख यांच्या सुमधूर आवाजात ध्येय गीताने सुरुवात झाली . प्रास्ताविक डॉ.सौ.सुनिता घुडे यांनी केले. संस्कार भारतीची स्थापना ते आज पर्यंतचा प्रवास त्यांनी मांडला संस्कृती जतन होणं किती गरजेच आहे हे सांगत त्यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. श्रीकांत राजे यांनी व्यासपीठासीनं मान्यवरांचा परिचयं करून दिला. त्यानंतर गुरुजनांचा शाल, श्रीफळ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यातं आला.
जवळपास निवड समितीने जवळपास २२ जनांची निवड केली. श्री.ना.च. यांचे उद्बोधन झाले त्यानंतर संध्याताईनी भाषण केले अभय घुडे यांचेअध्यक्षिय भाषणं झाले.यानंतर विनय राव यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा. संदीप देशमुख यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन प्रा.अमोल काटेकर यांनी केले यानंतर चहापान कार्यक्रम झाला
Discussion about this post