संजय फलके, शिरूर तालुका प्रतिनिधी
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री .डी .एन. ताठे माध्यमिक विद्यालय ,कारेगाव या विद्यालयात कार्यक्रम घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.विमल झावरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post