
ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर च्या रेड रिबन क्लब विभागा अंतर्गत जागतिक एड्स दिन सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात रेड रिबन क्लब व आयसीटीसी उपजिल्हा सामान्य रुग्णालय, चिमूर व संकल्प बहूउद्देशीय ग्रामविकास संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती समस्या व निराकरण या विषयावर जनजागृतीसाठी प्रभात-फेरीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हुमेश्वर आनंदे आणि प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा सामान्य रुग्णालय चिमूर येथील डॉ. अश्विन अगडे (वैद्यकीय अधीक्षक) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेड रिबन क्लब चे समन्वयक डॉ. ठवकर , आयसिटीसी समुपदेशक कामिनी हलमारे, आयसिटीसी समुपदेशक सुमेध साखरे, लिंक वर्कर रोहिणी मॅडम , तसेच महाविद्यालयातील डॉ. शील, डॉ. वऱ्हाडे , डॉ. सातव , प्रा. मेश्राम, प्रा. माणिक, डॉ. वावरे, प्रा. केदार, प्रा. हितेश, प्रा. निकेश, डॉ. टेंभूर्ने , प्रा. खोब्रागडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या रॅली दरम्यान परिसरात व समाजात एड्स बद्दल जी जनभावना आहे त्यासंबंधी जनजागृती करण्यात आली. तसेच एड्स या रोगाबद्दल जनजागृतीपर घोषणा करून सर्व समाजाला प्रेरित करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.
Discussion about this post