प्रतिनिधी सुधीर गोखले
महापालिका क्षेत्रातील गोर गरीब गरजू रुग्णांना वरदान ठरलेल्या महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती निदान केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी सांगली जिल्हयात सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका दुसरी शासकीय संस्था ठरली आहे याआधी सांगली जिल्हा परिषदेला हा पुरस्कार जाहीर झाला होता. आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील यांच्या नियंत्रणाखाली काका हलवाई या निदान केंद्राचे काम पाहतात. आजमितीस पन्नास हजाराहून अधिक रुग्णांनी या मध्यवर्ती निदान केंद्राचा लाभ घेतला असून अत्यल्प दरामध्ये याठिकाणी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात या केंद्राद्वारे महापालिकेलाही कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र रुग्ण सेवा केंद्रस्थानी ठेऊन महापालिकेने हे अद्ययावत मध्यवर्ती निदान केंद्राची उभारणी केली आहे. जुन्या इमारतीला डागडुजी करून हि इमारत उभारली गेल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. मध्यवर्ती निदान केंद्रामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली अनेक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. चाचण्या अचूक येत असल्याने उत्तरोत्तर रुग्णाची संख्याही वाढत आहे. स्कॉच पुरस्कारासाठी लागणारे सर्व निकषांची आरोग्य विभागाकडून तंतोतंत पूर्तता झाल्याने आणि प्रशासनातील योग्य समन्वयाने या पुरस्कारापर्यंत आम्ही पोचू शकलो अशी भावना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली ते म्हणाले, आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची वाटचाल आधुनिकतेकडे सुरु आहे. त्यांच्या आधुनिक संकल्पना शिस्त आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी असलेल्या योग्य समन्वय यामुळे आज आम्ही हे लक्ष गाठू शकलो. भविष्यातही अशीच चांगली कामगिरी आमच्या हातून होत राहील. या केंद्राचे केंद्र संचालक काका हलवाई म्हणाले माझ्या सेवा निवृत्तीच्या अंतिम टप्प्यामध्ये या पुरस्कारामुळे चार चांदच लागले आहेत. हा पुरस्कार म्हणजे माझ्या सेवेचे सार्थक झाले आहे आयुक्त शुभम गुप्ता आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ वैभव पाटील यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे हे फळ म्हणावे लागेल.
Discussion about this post