



निलंगा/प्रतिनिधी :
बांगलादेशातील हिंदू समाजावर, महिलांवर अत्याचार व साधू संतांचा छळाच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने निलंगा येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करत सबंध हिंदू बांधवांच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे.
बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने होणारे अन्याय, अत्याचार, महिलावर बलात्कार, साधु संतांचा अमानुष छळ या सारखा घटनां घडत आहेत. याच्या निषेधार्थ निलंगा येथील सकल हिंदूसमाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये येथील व्यापारांनी सहभाग नोंदवत आपले दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये १००% सहभागी झाले. सदरील घटनांच्या निषेधार्थ संपुर्ण देशभरात अतिशय तीव्र संताप व्यक्त केला जात असुन,त्याचे पडसाद महागाष्ट्रातील गाव-खेडयातील हिंदु समाजात उमटत आहेत. या सर्व बाबींची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जावी म्हणुन निलंगा बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. या बाबत येथील सकल हिंदू समाजाच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
निलंगा शहरातील निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासूनच हिंदू बांधव रस्त्यावर उतरत बांगलादेश सरकारच्या जाहीर निषेधच्या घोषणा देण्यात आल्या व होणारा अत्याचार तात्काळ थांबवावा अशी एकजुटीने मागणी करण्यात आली. या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती. या कडकडीत बंदमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणे आंदोलन व कडकडीत बंद शांततेत पार पडला आहे.
यावेळी सर्व जाती धर्मातील समाज बांधव उपस्थित होते..
Discussion about this post