

-वाशीम जिल्ह्यातील एक सक्षम आणि दमदार नेतृत्व, तथा सलग पाच वेळा लोकसभेच्या खासदार राहिलेल्या मा. आमदार भावनाताई गवळी यांना मंत्री मंडळात स्थान देण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संजय भुतेकर यांनी एका निवेदनात केली आहे. प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने त्याचा आकांक्षित वाशीम जिल्ह्याला नक्कीच फायदा होईल.
वाशीम जिल्ह्यात अनेक समस्या आहेत आणि भावनाताई ह्या मा. एकनाथ शिंदे च्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात, शिंदे यांच्या उठावा वेळी भावनाताई त्यांच्या हिरीरीने सोबत होत्या, शिवाय शिंदे नी तसा शब्द ही दिल्याचे बोलले जाते. मतदार संघाच्या सर्व समस्याची जाणीव असणाऱ्या लोकनेत्या भावनाताई गवळी यांना मंत्री मंडळात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे..
Discussion about this post