मिरज शहरातील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर अखेर पथदिवे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. शहरातील बहुचर्चित या रस्त्याच्या मध्यभागी अखेर पथदिवे बसवण्याचे काम आता काही दिवसात पूर्ण होईल. गेल्या काही महिन्यांपासून मिरज सुधार समितीचा पाठपुरावा सुरु होता आज त्याला यश आले. जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचे काम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे. पथदिवेसाठी केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहेत. 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसविल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पथदिवे आणि दुभाजक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पथदिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहिर मुजावर, नरेश सातपुते, सलीम खतीब, अभिजीत दानेकर, वसीम सय्यद, राकेश तामगावे, राजेंद्र झेंडे, रवी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post