इचलकरंजी महानगरपालिका जनसंपर्क विभाग प्रे.नो.३६२/२४
दि.११/१२/२०२४
प्रेस नोट
इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग, मॉडर्न हायस्कूल इचलकरंजी आणि रोटरी परिवार यांचे संयुक्त विद्यमाने ५२ व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण विभाग मॉडर्न हायस्कूल इचलकरंजी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्यूटिव्ह रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर आधारित ५२ वे विज्ञान प्रदर्शन २०२४-२०२५ चे आयोजन शहरातील मॉडर्न हायस्कूल येथील सुभाष खोत विज्ञान नगरी येथे करण्यात आलेले आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ गुरुवार १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता इचलकरंजी शहराचे आमदार मा. डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि मा. प्रभारी आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे (कोल्हे) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मा.एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये
विद्यार्थ्यांचे इयत्ता सहावी ते आठवी व नववी ते बारावी व दिव्यांग विद्यार्थी असे तीन गट असणार आहेत. तसेच प्राथमिक शिक्षकांचा एक गट,माध्यमिक शिक्षकांचा एक गट व प्रयोगशाळा परिचर असे तीन गट असणार आहे. सर्व गटांमध्ये मिळून एकूण १२५ स्पर्धक सहभागी झालेले आहेत.
या उद्घाटन समारंभासाठी उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, शिक्षणाधिकारी (योजना)अनुराधा म्हेत्रे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अध्यक्षा हिमानी चाळके, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे अध्यक्ष रो. सतीश पाटील, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्यूटिव्ह चे अध्यक्ष रो.गणेश निकम, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी च्या अध्यक्षा रो.
निनु लांबा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
इरफान पटेल
प्रशासन अधिकारी
इचलकरंजी महानगरपालिका
शिक्षण विभाग
Discussion about this post