
आपल्या दमदार कार्यशैलीतून अत्यंत कमी वेळात जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात संभाजी ब्रिगेडचा दमदार प्रभाव निर्माण करणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अमर भाऊ..
संभाजी ब्रिगेडच्या नांदुरा तालुका अध्यक्ष पदावर असतानाही त्यांनी फक्त नांदुराच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात संभाजी ब्रिगेडचा स्वतंत्र प्रभाव निर्माण केला, व आपल्या दमदार व अभिनव कार्यशैलीतून हजारो कार्यकर्त्यांची साखळी निर्माण केली आहे..
ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी अखंड स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्या उद्दिष्ट पूर्तीच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवत स्वराज्यासाठी लढणारे निष्ठावंत मावळे निर्माण केले. अगदी त्याच धर्तीवर अमर पाटील साहेब यांनी संभाजी ब्रिगेडच्या विचारांशी जुळतील असे हजारो कार्यकर्ते निर्माण केले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व तालुक्यातील गाव खेड्यात संभाजी ब्रिगेडच्या विचारांशी जुळलेला कार्यकर्त्यांचा अखंड जनसमुदाय म्हणजेच अमर दादांच्या निष्ठावंत मावळ्यांची जिरेबंद फौज..
Discussion about this post