
नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिल्लोड तालुक्यातील नावाजलेली जिल्हा परिषद प्रशाला पानवडोद च्या विदयार्थ्यांनी विविध गटात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादित केले. यात प्राथमिक विभागात ऋतुजा सुभाष दौड या विदयार्थीनीच्या कचरा व्यवस्थापन या प्रयोगस प्रथम क्रमांक तर माध्यमिक गटात कार्तिक ईश्वर वानखेडे व वैभव दौड या विदयार्थ्याच्या कार्बन प्युरिफिकेशन या प्रयोगस तृतीय क्रमांक मिळाला. या विदयार्थ्यांना विज्ञान शिक्षिका श्रीमती भारती मानकर स. शिक्षक रामेश्वर बसैये मुख्याध्यापक कमलाकर पारधे यांनी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, जेष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी राजू फुसे, रमेश ठाकूर, दादाराव फुसे, शालेय अध्यक्ष पांडुरंग तात्या दौड, सरपंच भाग्यश्री ताई भास्कर फुसे, विक्रांत पाटील, अनिल खरात, स्वप्नील मानकर, विजय वानखेडे, प्रमोद दौड सर्व शिक्षक वृंद व गावकरी यांनी कौतुक करून अभिनंदन केले..
Discussion about this post