वाई फुले नगर शहाबाग फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात या अपघातांमध्ये आतापर्यंत अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असून या रस्त्यावरून पाचगणी महाबळेश्वर ला जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात आवक जावक होत असते तसेच यांची वाहने अतिशय वेगाने या रस्त्याने ये जा करत असतात शहाबाग फाटा हे वाई शहरात जाण्यासाठी मार्ग आहे मात्र पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी येणारी जाणारी वाहन ही खूपच वेगात ये जा करत असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तरी तरी वाई फुलेनगर शहाबाद या ठिकाणी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन फुलेनगर शाहबाग ग्रामस्थांकडून वाई सार्वजनिक बांधकाम विभाग यांस देण्यात आले आहे निवेदन देताना शहाबाद ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मा.सागर जमदाडे , ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जमदाडे तसेच नंदकुमार नायकवडी, लोळे, राजपुरे आदि सर्व मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post