
शहर प्रतिनिधी,
अझहर पठाण..
कळंब :आज कळंब येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटबंना करणार्या माथेफिरू व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि,दि 10 डिसे रोजी एका माथेफिरू व्यक्तीने परभणी जिल्हा कार्यालया समोरील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या सविधानाच्या प्रतिमेची विटबंना केली. ही घटना अत्यत निदंनीय असल्यामुळे सर्व संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायी यांनी कळंब शहर कडकडीत बंद ठेवुन या घटनेचा जाहीर निषेध केला. व संविधान विटबंना करणार्या त्या माथेफिरू विरूद्ध शासनाने कठोर कार्यवाही करण्याचे निवेदन प्रशासनास दिले. व मुस्लिम समाज यांनी पाठिंबा दिला शेकडो संविधान प्रेमी उपस्थीत होते…
Discussion about this post