

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..
अहिल्यानगर येथील मध्यवर्ती बसस्थानक माळीवाडा हे सध्या प्रवाशांच्या गैरसोयीचे बस स्थानक बनलेले आहे.या बस स्थानकात नवीन काम चालू करण्यात आले आहे,एका छोट्याशा शेडमध्ये प्रवाशांना बस प्रतिक्षेसाठी थांबावे लागते.शेड अपुरे, लहान असून तेथे प्रवाशांच्या बसण्यासाठी कसलीही बैठक व्यवस्था केली नाही, प्रवाशी शेड मध्ये खाली बसतात.त्या शेड मध्ये माती व बारीक खडे असल्याने प्रवाशांना व्यवस्थित बसता येत नाही.बस स्थानकाचे नवीन काम चालू आहे हे ठिक आहे पण प्रवाशांना बसण्यासाठी तरी बैठक व्यवस्था केली पाहिजे होती.त्या शेड मध्ये प्रवाशांपेक्षा भिकारी गर्दुल्ले दारुडे वावरत असतात.शेडच्या बाजूला लघुशंका केल्यामुळे ती लघुशंका शेड समोर वाहत असते.सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते.पुरुष व महिला प्रवासी तोंडावर कपडा लाऊन बसलेले असतात.शेड मध्ये पंखा नसल्याने डासांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.बस स्थानकात बस येताच प्रवाशांची एकत्र झुंबड उडते, बसच्या मागे प्रवाशी धावतात.रात्रीच्या वेळी बस स्थानकाच्या प्रवेश व्दारा जवळ लाईट नसल्याने नवीन प्रवाशांना बस स्थानक शोधणे कठीण जाते.तरी राज्य परिवहन महामंडळाने नवीन बसस्थानक होईपर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी..
Discussion about this post