चहार्डी ता चोपडा, येथील जागृत देवस्थान मानले जाणारे सती कमळजा मातेच्या यात्रा उत्सवास ता.१४ डिसेंबर पासून प्रारंभ झाला असुन हि यात्रा मार्गशीर्ष महिन्यात भरवली जाते. व, यात्रेला जिल्हाभरातुन भावीक मोठ्या प्रमाणावर सती कमळजा मातेच्या दर्शनासाठी येतांना दिसतात, असेहि सांगितले जाते की, आई कमळजा देवीची यात्रा उत्सव हि ३०० वर्षापासुन चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे.
कमळजा मातेला आल्या भक्ती भावाने मानलेला नवस देखील पुर्णत्वास येतो , असे देखिल सांगण्यात येत. तसेच, चहार्डी गावातील हि यात्रा ग्रामीण भागातील असुन येथे , फार छान असे आनंददायी रम्यमान वातावरण पाहावयास मिळते. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आपले कुटुंब घेऊन बैलगाडी च्या साह्याने येतांना दिसतात. त्याचबरोबर लहान मुलं, महिला यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसुन येतो.
तसेच,यात्रेत खेळणी, पाळणे, स्विट च्या हाँटेलस, पत्रा पासुन बनवलेली गृहोपयोगी वस्तूंचे देखिल दुकानं मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्याच बरोबर या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दगळापासुन बनवलेल्या गृहोपयोगी वस्तू , भरगळे, जाते, कुटणी, पाटा, आदि , वस्तुंचा देखिल दुकानं मोठ्या प्रमाणावर आढळुन येतात.
आणि. प्रत्येक दुकानदारांनी आपआपले दुकान अगदी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने आखुण घेतलेले आपणांस दिसुन येते. अशी हि चहार्डी गावातील सती कमळजा मातेच्या यात्रा उत्सव ची ख्याती आहे. यात्रेचा आजचा २ दिवस असुन, हि यात्रा आठवडाभर सुरू असते.
Discussion about this post