प्रतिनिधी :- सतिश्र्वर नेवारे गोंडपिपरी (8459432185)गोंडपिपरी :- सकाळच्या सुमारास गोंडपिपरी आष्टी रोडवर सुरगाव गावाजवळ तीन वाहनांमध्ये भीषण अपघात घडून आला. या तिहेरी अपघातात एक इसम जागीच ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. व काही वेळातच त्यांना चंद्रपूर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे नाव कमल भूमीत असे असून ते ( हैदराबाद )येथील रहिवासी आहे. डी. डी. रॉय हे (आष्टी जि. गडचिरोली)येथील रहिवाशी असून ते गंभीर जखमी आहेत.त्यांचा उपचार ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे सुरु आहे. डी. डी. रॉय आणि कमल भूमीत हे दोघे MH – 33 -V-1738 क्रमांकाच्या चार चाकी वाहनाने गोंडपिपरी येथून आष्टी कडे जात असताना, त्याचं वेळेस आष्टी कडून गोंडपिपरी कडे येत असलेली MH-34-BY-9605 क्रमांकाच्या चार चाकी वाहनाची एकमेकांना धडक बसली.
दरम्यान त्याच वेळेस मागून येणारी पिकअप क्रमांक MH-33-T-2189 हे अपघात ग्रस्त कारला येऊन आपटली. धडक बेधडक असल्याने अपघात ग्रस्त वाहन व पिकअप रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. अपघात भीषण असल्याने कमल भूमीत यांचा जागीच मृत्यू झाला.तर डी.डी. रॉय यांच्या सह पिकअप वाहनात बसून असलेले दोन शेतकरी खूपच जखमी झाले. जखमींना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.मात्र यांना जबर मार असल्याने.त्यांना चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गोड पिंपरी चे पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे साहेब यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.
Discussion about this post