समीर बल्की – तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर :- दि. १४ डिसेंबर रोजी चिमूर तालुक्यातील भिसी येथे माना आदिम जमात मंडळ भिसी चे सौजण्याने गुरूवार व शुक्रवार ला दोन दिवशीय नागदिवाळी महोत्सव माँ माणिका देवी मंदीर भिसी येथे आयोजित केलेला होता. त्यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणुन मार्गदर्शन करतांना माजी मंत्री डॉ रमेशकुमार गजबे म्हणाले की, नागदिवाळी महोत्सवाचे निमित्ताने समाजाच्या चाली रिती, परंपरा, श्रद्धा, शिक्षण, यासह विविध विषयांचे मार्गदर्शन गृहन करण्याची संधी समाज बांधवाना पाप्त होत असते. यातुनच समाज परिवर्तनाची पेरणा मिळते. त्यामुळे नागदिवाळी महोत्सव परिवर्तनाचा उत्सव आहे. असे विचार प्रगट केले.
यावेळी अध्यक्ष म्हणुन माजी मंत्री डॉ रमेशकुमार गजबे, प्रमुख अतिथी म्हणुन माना आदिम जमात मंडळ चिमूर तालुका अध्यक्ष कवडू खडसंग, माजी पंचायत समिती सदस्या माया नन्नावरे, भारती गोडे, विजयकुमार घरत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दोन दिवशीय नागदिवाळी महोत्सवानिमीत्य गुरूवार ला दुपारी ३ वाजता मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण,
सायंकाळी ४ वाजता मुठपुजा, रात्री ६ वाजता भिसी शहरातील मुख्य मार्गाने विविध झाकीया सह भव्य दिप मिरवणूक, रात्री ८ वाजता जागृती भजन, शुक्रवार ला सायंकाळी ५ वाजता मान्यवरांचे नागदिवाळी महोत्सवानिमीत्य मार्गदर्शन सोहळा, ६ वाजता महापसाद, रात्री ८:३० वाजता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संचालन पा, डॉ दिनकर चौधरी यांनी केले तर पास्ताविक मार्गदर्शन विजयकुमार घरत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास रंदई, विनोद श्रीरामे, सुरेंद्र घरत, सुरेश धारणे, राजू चौधरी, साजन वाघ, सचिन ढोणे, संजय जांभुळे, धनराज खडसंग, मारोती दोडके, विशाल दडमल, श्रीकांत नन्नावरे, अंकुश बारेकर, नारायण सोनवाने, संजय सोनवाने, बबन घोडमारे तथा समस्त माना जमात बांधवांनी सहकार्य केले.
Discussion about this post