समीर बल्की तालुका प्रतिनिधी
चिमूर :- चिमूर, दि. १४ डिसेंबर : तालुक्यातील श्री गुरूदेव सेवा मंडळ, विठ्ठल रूखमाई देवस्थान भिसी यांचे सयुंक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतीथी महोत्सव सर्वसंत स्मृती मानवता दिन तसेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या काकड आरती निमित्य कार्तिक काला भिसी येथे शुक्रवार ला करण्यात आला. त्यावेळी किर्तनाचे माध्यमाने मार्गदर्शन करतांना कोटगांव, येथील महाराज म्हणाले की, ग्रामगीता ग्रामविकासाची संजीवनी आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतीथी महोत्सवाचे निमित्ताने शुक्रवार ला सकाळी ग्राम सफाई, सामुदायिक ध्यान साधना, सामुदायिक पार्थना करून महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. यापसंगी गवते महाराज यांनी मार्गदर्शन केले. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने रामधुन पालखी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ७ भजन कीर्तन मंडळांनी सहभाग घेतला होता. रामधुन पालखी चे महत्वावर चंदपुर येथील तुळशिराम नैताम यांनी मार्गदर्शन केले. कापसे महाराज
भिसी येथे राष्ट्रसंताची पुण्यतिथी महोत्सव
पुढे म्हणाले की, सर्व मानवाचे वर्तन हे शुद्ध असायला पाहीजे, आपले ग्राम निर्मल व्हावे, अंधश्रद्धा ही समुळ नष्ट व्हावी. आणि ग्रामगीता ही ग्रामविकासाची संजीवनी आहे. यानंतर सायंकाळी ४:५८ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.
महोत्सवाचे संचालन काटेखाये गुरूजी यांनी केले तर आभार विजयकुमार घरत यांनी मानले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी तेजने गुरूजी, देविदास गभणे, गरिबा निमजे, अशोक नान्हे, पंधरे गुरूजी, घोनमोडे गुरूजी, शेंडे बाबाराव रेवतकर, रतन शिवरकर, शांताराम गुरूजी, नान्हे, ज्ञानेश्वर भानारकर, हरिचंद्र नागपुरे, सतिश काळबांधे, संजय नान्हे, सुरेखा कामडी, माया घवघवे, सुनंदा कोथडे, सुखदेव मुंगले, राजू मुंगले, दयाराम कामडी, भास्कर कामडी, श्री गुरूदेव सेवा मंडळ भिसी, विठ्ठल रूखमाई देवस्थान भिसी चे समस्त पदाधिकारी तथा ग्राम वाशियांनी सहकार्य केले.
Discussion about this post