प्रतिनिधी यशवंत महाजन.
कल्याण : येथील पश्चिमेतील
गोल्डन पार्क भागातील बेतुरकरपाडा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षाच्या तरुणाला दोन महिन्यापूर्वी भटका श्वान चावला होता. त्यानंतर मांजर चावली. हे दोन्ही प्राणी चावल्यानंतर तरुणाने रुग्णालयात जाण्याऐवजी हे दोन्ही आजार अंगावर काढले. अलीकडे त्याला त्रास सुरू झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी मृत्यू झाला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी पालिकेच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे माध्यमांना दिली आहे.
Discussion about this post