15/12/2024
*अकोला:
हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विवाहितेचा निंबोळी, ता. मलकापूर (जि. बुलढाणा) येथील वैभव गोपाळ शेळके यांच्याशी ३१ मे २०२१ रोजी विवाह झाला होता. मात्र, पतीने लग्नानंतर सोय झाली नाही, लग्नाकरिता २० लाखांची कार विकत घेतली, त्याचे पैसे तुझ्या वडिलांकडून घेऊन ये, असा तगादा लावला व मानसिक त्रास दिला. नंदोई प्रदीप याने विवाहितेच्या वडिलांना बोलावून जबरदस्तीने माहेरी पाठविले.
Discussion about this post