16/12/2024
अकोला:
खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत कौलखेड चौक परिसरातील भरतीय यांच्या कारखान्याजवळ एका भरधाव स्कार्पिओ वाहनाने ऑटोला जबर धडक दिल्याची घटना रात्री उशिरा घडली. या अपघातात दोन चिमुरड्यांसह त्यांची आजी व आणखी दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका महिलेच्या दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन चिमुरड्यांवरही उपचार सुरु आहेत. कौलखेड परिसरातील रहिवासी लता ठाकूर व त्यांचे कुटुंबीय ऑटोने घराकडे येत असताना अपघात झाला.
Discussion about this post