येथून जवळच असलेल्या टाकळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील तीन विद्यार्थी महादीप परीक्षेमध्ये तालुकास्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हास्तर परीक्षेसाठी पात्र झाले आहे. यात वर्ग सातवीतील ओम सतीश श्रीरामोजवार व वैभव सुदाम उप्परवार तर वर्ग पाचवीतील कु. द्रविता गजानन मारशेट्टीवार हयांनी हे यश संपादन केले आहे.
या निमित्ताने वरील गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालेंद्र गोपेवार, उपाध्यक्ष सतीश मन्ने, मुख्याध्यापक मंगेश यमसनवार, सहा.शिक्षक गजानन सुंकावार ,अनिल चिंतकुंटलावार, सुजाता बंडेवार यांनी शैक्षणिक साहित्य भेट देऊन कौतुक केले आहे.
Discussion about this post