






भातकुली तालुका प्रतिनिधी / हरीश हजारे
विस्तार अधिकारी प्रल्हाद तेलग पंचायत समिती भातकुली यांनी ग्रामपंचायत गणोजा देवी येथील चौकशी न करता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या कडे प्रशासनाची दिशाभूल करून दिला बोगस जुनाच अहवाल..
गटविकास अधिकारी,प्रवीण वानखडे विस्तार अधिकारी, प्रल्हाद तेलंग ग्रामपंचायत तत्कालीन सचिव राजू धरमठोकहे भ्रष्टाचारात सामील असल्यामुळे यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापत्रा यांच्या कडे ग्रामपंचायत सदस्य रिजवानखान पठाण, यांनी दिली लेखी तक्रार..
भातकुली =
तालुक्यातील ग्रामपंचायत गणोजा देवी येथील स्मशानभूमी बांधकाम व 15 वा वित्त आयोग मधून करण्यात आलेली विकास कामामध्ये भ्रष्टाचार झालेल्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिकांनी तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे पंचायत समिती भातकुली यांचे कडे लेखी तक्रार सन 2022 मध्ये दाखल केली असता सदर ग्रामपंचायत गणोजा देवी येथे प्रशासकीय कारभार सन 2019/20 या दोन वर्षांमध्ये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी प्रल्हाद तेलंग हे होते व तत्कालीन सचिव राजू धरमठोक या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून ग्रामपंचायत गणोजा देवी येथे कामात अनियमितता केलेली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी तेलंग याची नियुक्ती केली असता तेलंग यांनी सचिव धरमठोक यांना वाचवीन्यकारिता बोगस चौकशी अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल केली तेव्हा जिल्हा परिषद येथे सुनावणी मध्ये पुन्हा ग्रामपंचायत गणोजा देवी येथील चौकशी तक्रारी च्या 30 मुद्द्यावर अहवाल तयार करण्यासाठी आदेश देण्यात आले.



वरीठांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी यांनी पुन्हा तेलग यांना दि 23 एप्रिल 2024 रोजी ग्रामपंचायत गणोजा देवी येथे जाऊन चौकशी करण्यासाठी पत्र दिले असता तेलंग यांनी ग्रामपंचायत ला जाऊन फक्त तक्रारकर्ते यांचे बयान नोदऊन घेतले व कुठ्ल्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. तेव्हा पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापत्र यांनी तीन वेळा कारणे दाखवा नोटीस चौकशी बाबत पाठवली असता कार्यरत गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे यांची प्रल्हाद तेलग विस्तार अधिकारी यांनी दिशाभूल करून जुनाच अहवाल वानखडे यांच्या सहीने पाठवला व पत्रामध्ये लिहिले कि वेगळी चौकशी करण्याची आवश्यकता नाही.
सदर प्रकरणात विस्तार अधिकारी तेलंग व सचिव राजू धरमठोक हे दोषी असून ते स्वतः चा दोष लपविण्याकरिता चौकशी करीत नसल्याने पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे तेव्हा सदर तक्रारी मध्ये गटविकास अधिकारी, प्रवीण वानखडे,विस्तार अधिकारी प्रल्हाद तेलंग, पंचायत समिती भातकुली व ग्रामपंचायत गणोजा देवी येथील तत्कालीन सचिव राजू धरमठोक यांची सखोल चौकशी जिल्हा परिषद मार्फत करून यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार कारवाई करून यांना शासकीय सेवेतून कार्यमुक्त बडतर्फ करण्यात यावे. याकरिता सविस्तर तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी सजिता मोहापत्र जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील नागरिकांनी लेखी तक्रार दाखल केली आहे..
Discussion about this post